अशीच अमुची शाळा असती
शाळा सुटली, पाटी फुटली,
आई मला भूक लागली :)
लहानपणी हे गाणं म्हटलं त्याला खूप दिवस झाले. माझी १०वी नंतर शाळा सुटली त्याला जवळजवळ १२ वर्ष होऊन गेली, आणि त्यानंतर शाळेत जायचा प्रसंग आला तो सरळ MA, M.Phil. झाल्यावर, थेट अमेरिकेत, शिक्षिका होण्यासाठी Ed.M. मधे दाखल झाल्यावर! Ed. M. म्हणजे आपल्याकडे बी. एड असतं तसंच, फक्त पदव्योत्तर अभ्यासक्रम (Masters) असल्यामुळे थोडं अधिक demanding म्हणायचं. निदान मला तरी ते अधिक demanding वाटलं- त्याचं कारण हे नवीन "अमेरिकन शिक्षणपद्धती" हे रसायन ही असू शकेल.
ह्या अमेरिकन शिक्षणपद्धतीला समजून घेतांना बरेच प्रश्न पडले, बरंच आश्चर्यही वाटलं, आणि तितकंच कौतुकही! पुन्हा सर्वाथाने शाळेत जातांना (इथे विद्यापीठालाही "स्कूल" म्हणतात हे तर प्रसिद्धच आहे ) इतकं काही शिकायला मिळालं, की शिक्षिका कसली होतेय मी- विद्यार्थिनीच बनले पुन्हा एकदा!!!
अगदी पहिला प्रसंग आठवतो म्हणजे पहिल्या दिवशी विद्यापीठातल्या वर्गाला गेले तो! तिथे जायचं, शांतपणे टिपणं घ्यायची, प्राध्यापकांचा प्रत्येक शब्द ब्रह्मवाक्य मानायचा, ह्या पठडीतली मी. पोचले, तर वर्गात सगळेजण गोलात बसलेले, आणि त्यात प्राध्यापक कुठले, हे मला कळायचं एकमेव कारण म्हणजे मी आधी त्यांना प्रवेशाच्या संदर्भात भेटले होते! मग सर्वप्रथम "ओळख-परेड" सुरू झाली. प्रत्येकाने फक्त आपलं नावच नाही, तर आपल्याविषयी एखादी विशेष गोष्टही सांगायची, आणि प्रत्येकाने "स्मरणशक्ती" खेळाप्रमाणे आधीच्या सगळ्यांची नावं आणि विशेष लक्षणंही लक्षात ठेवून सांगायची! आता आमच्या वर्गात जरी फक्त २४ लोक होते, तरीही ह्या प्रकारात जवळजवळ अर्धा पाऊण तास गेलाच. मधे मधे भरपूर विनोद, एकमेकांची थट्टा, कोणी मधेच उठून "coke" घेऊन आलेले, कोणी चक्क पाय वर घेऊन बसलेले.... इथे आपण नक्की शिक्षण विषयाच्या वर्गात आहोत, की सायंकालीन मनोरंजन शिबिरात आहोत, असा विचार मी करत असतांनाच प्राध्यापिकेने कोर्सचा पुढील आराखडा मांडायला सुरूवात केली.
प्रत्येकाला कोर्सची समग्र माहिती असलेलं syllabus दिलं. त्यात कोणत्या दिवशी कोणता धडा, कोणती पानं वाचून यायची, त्याचं वेळापत्रक होतं. कोर्सच्या दर टप्प्यावर कोणत्या assignments कुठल्या दिवशी द्यायच्या, त्याची माहिती, शिवाय प्रत्येक assignment चं सविस्तर स्पष्टीकरण होतं. प्रत्येक assignment कोणत्या निकषांवर तपासली जाईल, तेही लिहिलेलं. आणि वर प्रा. बाई विचारतात, “कोणाला काही प्रश्न आहेत का?” ह्यावर एकाने, “हा अमुक पेपर किती पानांचा हवा?” हे विचारूनच घेतलं. मुळात Graduate (आपल्या भाषेत Masters) level नंतर परीक्षा हा प्रकार साधारणत: नसतोच. त्या ऐवजी ५ पानी निबंध, छोटे Reflective Responses, किंवा वर्षाच्या शेवटी मोठं project अशा विविध तहेने प्रगती तपासली जाते. स्मरणशक्तीवर भर नसून विश्लेषणावर असतो. वर्गातल्या चर्चेतला सहभाग ही सुद्धा grade साठी महत्त्वाची बाब असते.